22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूर हिंदूंत्ववादी संघटनांचा औसा येथे कडकडीत बंद  

 हिंदूंत्ववादी संघटनांचा औसा येथे कडकडीत बंद  

औसा :  प्रतिनिधी
बदलापूर येथील एका खाजगी शाळेतील दोन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा आणि बांगलादेश मधील हिंदूं नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ औसा शहरात हिंदूंत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शनिवारी दि २४ ऑगस्ट रोजी शहरातील सर्व व्यापा-यांनी आपले व्यापारी आस्थापना बंद ठेवून मोर्चा प्रतिसाद दिला. औसा येथील किल्ला मैदानापासून शहरातील मुख्य रस्त्यावरून विश्व हिंदूं परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, राष्ट्रसेविका, समिती दुर्गा, वाहिनी व इतर ंिहदुत्ववादी संघटनांच्या वतीने आयोजित हुंकार मोर्चा काढून बदलापूर येथील घटनेतील आरोपीला कडक शक्षिा करावी आणि बांगलादेशांमधील ंिहदूचे संरक्षण करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करीत तहसील कार्यालयासमोर ंिहदुत्ववादी संघटनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार घनश्याम अडसूळ यांना देण्यात आले.
यावेळी आमदार अभिमन्यू पवार  हे स्वत: हातात भगवा घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेक-यामध्ये औसा बाजार समितीचे उपसभापती भिमाशंकर राचट्टे , माजी नगराध्यक्ष किरण उटगे, समीर डेंग , बंडू कोद्रे, सोमनाथ वागदरे, सुनील उटगे, सागर भंडारी, जगदीश परदेशी, जगदीश चव्हाण, सागर आपुणे, हनुमंत कांबळे, निवृत्ती कटके,   सुनिता सूर्यवंशी, गोंविद सोनवणे, नारायण माळी, गोंिवद मुडदे,यांच्यासह   शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR