22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeउद्योग१०,५३३ कोटींची कर चोरी; १० विमान कंपन्यांना नोटिस

१०,५३३ कोटींची कर चोरी; १० विमान कंपन्यांना नोटिस

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाने भारतात संचालन करणा-या १० दिवेशी एअरलाइन्सना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. त्यांच्यावर तब्बल १०,५३३ कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप आहे. आमिरात एअरलाइन्सवर सर्वाधिक ७,५५० कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप आहे.
वर्ष २०२३ मध्ये या कंपन्यांची चौकशी झाली होती. आता त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या कंपन्यांच्या विमानांची देखभाल, वैमानिक वेतन आणि भाडे यांसारख्या सेवा विदेशातील मुख्यालयांतून प्रदान केल्या जातात. सेवा एका कंपनीकडून दुस-या कंपनीला दिल्या जात असल्याने त्या करपात्र आहेत.

किती कोटी बुडविले?
(आकडे कोटी रुपयांत)
अमिरात एअरलाइन्स – ७,५५०
एतिहाद एअरवेज – १,६६०
सौदी अरब एअरलाइन्स – ६१२
एअर अरेबिया – ४५५
ओमान एअरलाइन्स – ७१
थाई एअरवेज – ६०
कतार एअरवेज – ५३
स्ािंगापूर एअरलाइन्स – ४०
ब्रिटिश एअरवेज – ३३

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR