बार्शी : घर आमच्या नावावर कर, अन्यथा तुझ्या पोरीला नाचवून १५ लाख रुपये आण तरच नांदवीन नाहीतर तुझा काटा काढीन, अशी धमकी देवून या कौंटुबिक वादातून सून व तिच्या मुला-मुलींना हाकलून दिल्याप्रकरणी प्रतिभा नितीन काळे हिने बार्शी शहर पोलिसात पती,दीर, सासू व नणंद विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पती नितीन काळे, दीर दिपक काळे, सासु छबुबाई काळे, नणंद रागिणी काळे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल आहे. पती नितीन व्यसनी व बाहेरख्याली स्वभावामुळे त्याचेवर कर्ज झाले होते. त्यामुळे पतीने सासु व नणंद याचे ऐकुन अधिक पैसे कमविण्याचे लोभापायी फिर्यादी प्रतिभाला तु लोकनाटय कला केंद्रावर नाचणेसाठी जा असे म्हणुन वाद घालू लागले. लोकनाटय कला केंद्रामध्ये काम करण्याची मानसिकता नसलेने त्यांना प्रतिभाने समजावुन सांगत होते.
दरम्यान माहेरहून पैसे आण नाहीतर तु नाचायला जा, असे म्हणुन सतत त्रास देत असलेने याबाबत प्रतिभाने माहेरी आईस सांगितले होते. त्यावेळी आईने स्वतः पैश्याची जुळवाजुळव करुन जावई नितीन यांना ४ लाख रुपये दिले होते. त्यानंतर काही दिवस व्यवस्थित नांदविले. पुन्हा पैशाची अडचण असलेने माहेरहून १५ लाख रुपये घेवुन ये, असे म्हणुन प्रतिभा व मुलींसोबत वाद घालत त्यांना माणसिक शारिरीक त्रास देणे सुरु केले. तसेच कुटुंबातील सर्वांनी तुझे नावावर असलेले दुकान व घर आमचे नावावर कर नाहीतर तुझे मुलीला आमचेसोबत चिरा उतरायला पाठव, आम्ही पैसे कसे वसुल करायचे ते पाहतो असे म्हणून मुलीला व फिर्यादीस मारहाण केली होती .
तु तलाक दे नाहीतर तुला केजमध्ये राहु देणार नाही. तुझा काटा काढीन अशी धमकी दिली होती. वाद वाढत गेलेने फिर्यादी व मुलांना घरातून हाकलुन दिले तेव्हापासून फिर्यादी माहेरी बार्शी येथे आईकडे राहतआहे. ८ जून रोजी पती नितीन बाशींत आल्यानंतर फिर्यादीने पतीस तुम्ही मला व लेकरांना नीट संभाळा तुमचेसोबत नांदणेस तयार आहे असे सांगत असताना त्यानी मला आमचे ठरले आहे, तुझे नावावरील घर व दुकान आमचे नावावर कर नाहीतर तुझे पोरीला नाचवून १५ लाख रुपये आण तरच मी तुला नांदविन असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी केली.