16.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमुख्य बातम्या१५०० रोहिंग्यांना मिळाला मालेगावचा जन्मदाखला

१५०० रोहिंग्यांना मिळाला मालेगावचा जन्मदाखला

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव हे रोहिंग्यांचे आश्रयस्थान झाले आहे. आपल्याकडे यासंदर्भात मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत. मालेगावातून व्होट जिहाद सुरु आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. ते म्हणाले, मालेगावात १५०० बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्मदाखला देण्यात आला आहे. ही खूप गंभीर बाब आहे. या प्रकरणात मी स्वत: लक्ष देत आहे. या प्रकरणात दोन प्रकारचे गोंधळ दिसत आहेत. एकिकडे सर्व सामान्य माणूस फसत आहे. दुस-या बाजूला राजकारणी, माफिया, गुंड, भ्रष्टाचारी, ड्रग माफिया ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी मनी लॉँड्रींग करीत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातून आणि आयुक्त कार्यालयातून हे दाखले देऊन टाकले आहेत. त्यावर एकच पत्ता आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनविण्यासाठी जन्म दाखला देण्याचा हा प्रकार आहे. मालेगाव तहसीलदार, महानगरपालिका आयुक्त यांनी आपली चूक मान्य केली आहे. अनवधानाने हे जन्मप्रमाणपत्र देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यांना प्रमाणपत्र दिले आहे त्यांची परत चौकशी केली जाणार असल्याचे अधिका-यांनी सांगितल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

मालेगावात झालेल्या नामको बँक १२५ कोटी अपहार प्रकरणात चौकशीसाठी किरीट सोमय्या सोमवारी मालेगावात दाखल झाले. यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. त्यांना या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणार आहोत. मालेगावातील बांगलादेशी आणि रोहिंग्यांची पडताळणी करण्याचे काम एटीएसने करावे, अशी मागणी करणार आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR