28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूर२० जि. प. शाळांच्या लॅबची होणार तपासणी

२० जि. प. शाळांच्या लॅबची होणार तपासणी

लातूर : प्रतिनिधी
खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनाही विज्ञान, तंत्रज्ञान व गणित विषयात प्रगल्भ होण्यासाठी लातूर जिल्हयातील २० जिल्हा परिषदेच्या शाळभेत भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. सदर शाळेत लॅबची उभारणी झाली आहे की नाही याची तपासणी जिल्हास्तरीय पथकाच्यामार्फत लवकरच होणार आहे.
लातूर जिल्हयातील स्थानीक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषदेच्या २० शाळेत राज्य प्रकल्प संचालक मुंबई यांच्या मार्फत भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. यात लातूर तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा खुलगापूर, जि. प. प्रा. शाळा मळवटी, जि. प. शाळा भातखेडा, जि. प. प्रा. शाळा बामणी,  उदगीर तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा देवर्जन, जि. प. प्रा. शाळा मुलींची उदगीर, जि. प. प्रा. शाळा मुलींची वाढवणा बु., जि. प. प्रा. शाळा तोंडचिर, निलंगा तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा मुलींची निलंगा, जि. प. प्रा. शाळा गौर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा हिप्पळगाव, जि. प. प्रा. शाळा येरोळ, जि. प. प्रा. शाळा मुलींची शिरूर अनंतपाळ, जि. प. केंद्रीय प्रा. शाळा कांबळगा, चाकूर तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा लातूर रोड, जि. प. प्रा. शाळा अंबुलगा, जळकोट तालुक्यातील जि. प. केंद्रीय प्रा. शाळा वांजरवाडा, जि. प. प्रा. शाळा जळकोट, देवणी तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा हेळंब, रेणापूर तालुक्यातील जि. प. केंद्रीय प्रा. शाळा खरोळा या शाळांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला साहित्य देण्यात आले आहे. विज्ञान, खगोलशास्त्राचे साहित्य शाळेत पोहचले आहे की नाही, त्याची उभारणी केली आहे की नाही, त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हा स्तरीय समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या मार्फत लवकरच जिल्हा परिषद शाळांची लवकरच तपासणी करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR