27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र४, ७ सप्टेंबरला देवनार कत्तलखाना बंद

४, ७ सप्टेंबरला देवनार कत्तलखाना बंद

मुंबई महानगरपालिकेचा आदेश

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला असून, ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी देवनार येथील कत्तलखाना बंद राहणार आहे. याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, जैन समाजाच्या पर्युषण उत्सवादरम्यान ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी देवनार पशुवधगृह बंद राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त-सह-प्रशासक भूषण गगराणी यांनी हा आदेश जारी केला आहे.

जैन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने पर्युषण सणाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत जनावरांची कत्तल आणि मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याची मागणी एका याचिकेव्दारे केली होती. या याचिकेरील सुनावणी मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायालयाने महापालिकेला कत्तलखाने बंद ठेवण्या संदर्भात निर्देश दिले होते. दरवर्षी जैन समाजाच्या पर्युषण उत्सवादरम्यान देवनार पशुवधगृह बंद ठेवले जाते.

दरम्यान, यावेळी हा उत्सव ४ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त-सह-प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतला आहे. याशिवाय गणेश चतुर्थीच्या दिवशी देखील देवनार कत्तलखाना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशात म्हटले आहे की २०१५ च्या निर्णयानुसार, गणेश चतुर्थी दिवशी देवनार कत्तलखाना बंद ठेवला जातो. योगायोगाने यंदा जैन समाजाचा पर्युषण सण ४ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे ४ आणि ७ सप्टेंबरला कत्तलखाना बंद राहणार आहे.
————–

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR