शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
रब्बी हंगामाच्या मध्यातरांत कोथिंबीरला चांगलाच भाव आला आहे.सय्यद अंकुलगा येथील युवा शेतकरी मेहराज सय्यद यांच्या फ क्त ४५ गुंठे कोंथिंबीरच्या फडाला तब्बल १ लाख ५५ हजाराचा भाव मिळाल्याने ते मालामाल झाले असून कोथिंबीर उत्पादकांना सध्या अच्छे दिन आल्याचे दिसत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतक-यांनी कोंिथबर लागवड केली. मात्र बाजारात भाव नसल्याने अनेकांनी कोंिथबीर मोडीत काढली होती.यातच लग्नसराई सुरु झाल्याने मागणी वाढली तसे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मध्ये भावात वाढ झाल्याने व्यापारी बांधावर येवून अधिकचा दर देत कोंिथबीर विकत घेत असल्याने उत्पादकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान गेल्या काही वर्षापासून निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.एकामागून एक संकटे शेतक-यांवर येत आहेत.मात्र शेतकरी अशा परिस्थितीत ही धडपड करत असून पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळला आहे.‘विकेल ते पिकेल’ या म्हणी प्रमाणे शेतकरी नगदी पिकांकडे वळला असून भाजीपाला लागवड करत आहे. त्यात खरीपात मोठी मेहनत करून देखील भाव मिळाला नसल्याने शेतकरी हताश झाले होते.मात्र अखेर गेल्या काही दिवसापासून कोंिथबरला चांगला भाव मिळत असल्याने उत्पादक शेतक-यांची चिंता दुर झाली आहे.
रब्बी हंगामात रोगाच्या प्रादुर्भावाने हरभरा हातचा गेला असून शेतकरी हरभरा मोडीत काढून नगदीचे पिक म्हणून कोंिथबीर लागवडीला पसंती देत आहेत.कमी वेळ, कमी लागवड खर्च व त्यात आता चांगला भाव मिळत असल्याने शेतक-यांनी कोंिथबीर लागवड करत आहेत.यात तालुक्यातील सय्यद अंकुलगा येथील युवा शेतकरी मेहराज सय्यद यांना अवघ्या ४५ गुंठ्यात दिड लाखाचे उत्पन्न झाले असल्याने अडचणीत त्यांच्या अर्थकारणाला बळ मिळणार आहे.