29.7 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeलातूर६९ झाडांचा पहिला वाढदिवस

६९ झाडांचा पहिला वाढदिवस

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील सामनगाव या गावात दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने गतवर्षी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरादरम्यान लावलेल्या ७५ पैकी ६९ झाडांचा पहिला वाढदिवस मंगळवारी मोाठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झाडांना फुगे बांधून आनंद उत्सव साजरा झाला. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून, सामनगावकरांनी वृक्षांचे संवर्धन करून देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
लातूर तालुक्यातील मौजे सामनगाव येथे दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने गतवर्षीपासून राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष वार्षिक शिबिर घेतले जात आहे. शिबिराचे हे दुसरे वर्ष असून, गतवर्षी शिबिरादरम्यान गावात नारळ आंबा यासह पर्यावरणपूरक ७५ झाडांची लागवड करण्यात आली होती. या ७५ झाडांपैकी ६९ झाडे येथील सरपंच प्रीतीताई बुलबुले, उपसरपंच स्वातीताई बुलबुले, ग्रामसेवक शिवकुमार नरवणे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकाराने जगविण्यात आली. विशेष म्हणजे या वृक्ष संवर्धनासाठी गावातील युवक दत्ताभाऊ बुलबुले यांनी विशेष पुढाकार घेऊन झाडांचे संवर्धन केले आहे. ७५ पैकी ६९ झाडांचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असून, केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचे संवर्धन करुन सामनगावकरांनी लातूर जिल्हा समोर नव्हे तर संपूर्ण देशासमोर एक आदर्श उभा केला आहे. या ६९ झाडांचा वाढदिवस फुगे बांधून तसेच ग्रामस्थांना साखर वाटून यावेळी करण्यात आला. वृक्ष संवर्धन बद्दल दत्ताभाऊ बुलबुले यांचा दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने शाल व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक शंकर बुलबुले यांच्यासह ईश्वर बुलबुले, बालाजी बुलबुले, महादेव ढगे, गजेंद्र बुलबुले, गणेश बुलबुले, बापू झुंजारे, दत्तात्रय बुलबुले, विजयमूर्ती येलूरकर, अभिषेक बुलबुले, लिंबराज बुलबुले, शिवानंद बुलबुले, शिवानंद झुंजारे, शांतवीर वाडीकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.विशाल वर्मा, प्रा. निलेश मंत्री, प्रा. योगेश शर्मा आदींची उपस्थिती होती.
दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने लातूर तालुक्यातील मौजे सामनगाव येथे २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत विशेष युवक शिबिर होत आहे. या शिबिरा अंतर्गत दररोज सकाळी तीन तास स्वयंसेवक विद्यार्थी व ग्रामस्थ तसेच गावातील युनिटी ग्रुप यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. शिवाय मंगळवारी झाडांची रंगरंगोटी करण्यात आली. झाडांना कसलेही प्रकारची इजा होऊ नये, यासाठी खाण्याचा चुना आणि काव हे रंग वापरण्यात आले. एकंदरीत, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरादरम्यान गावागावात स्वच्छतेबद्दल प्रबोधन केले जात आहे आणि याला ग्रामस्थ देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR