22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्र८ वर्षे झाली पण अजून शिवस्मारक उभे का राहिले नाही?

८ वर्षे झाली पण अजून शिवस्मारक उभे का राहिले नाही?

नवी मुंबई : प्रतिनिधी
गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला पण महाराष्ट्रात अजून छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहिला नाही, असे विधान करत स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली.
दरम्यान, २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते. पण, अजूनही त्या स्मारकाचे काम सुरू झाले नाही. याच मुद्यावरून संभाजीराजे यांनी सवाल केला की, आठ वर्षे उलटल्यानंतरही शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

कोणत्याही प्रकल्पाचे पंतप्रधान यांच्या हस्ते जलपूजन होते, तेव्हा सर्व परवानग्या असणे गरजेचे असते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी कोटी रुपये खर्च झाले. मग ते स्मारक कुठे आहे? त्यामुळे आम्ही स्मारकाच्या शोधासाठी मोहीम आम्ही काढत आहोत. राज्यातील १३ कोटी जनतेला सरकारने उत्तर देणे गरजेचे आहे. असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. त्यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता. ६) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधण्याची मोहीम आयोजित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुढे संभाजीराजे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन केले. त्यानंतर मी एक-दोन वर्षे थांबलो होतो. मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि त्यानंतरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवस्मारकाबाबत विचारणा केली होती. शिवस्मारक बांधण्यासाठी समिती स्थापन होऊन काम का सुरू झाले नाही? असे मी विचारले.

त्यावर मला सांगण्यात आले की, अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या सगळ्या परवानग्या मिळालेल्या नाहीत. केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार आहे. मग हा प्रश्न मार्गी का लागत नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच, पंतप्रधान हा देशाचा प्रथम नागरिक असतो. मग सर्व परवानग्या मिळाल्या नव्हत्या, तर ते शिवस्मारकाच्या जलपूजनाला कसे आले? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवस्मारकाचे घाईगडबडीत जलपूजन करण्यात आले. त्यानंतर एल अँड टी कंपनीला टेंडर देण्यात आले. पण त्यानंतर ८ वर्षांत पुढे काही घडलेच नाही. शिवस्मारकासाठीचे करोडो रुपये कुठे गेले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR