मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते असल्याचा आरोप अनेक वेळा होत आहे. परंतु आता अंतरवली सराटीत झालेल्या आंदोलनाबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अन् मंत्री छगन भुजबळ यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.
अंतरवली सराटीमध्ये २ सप्टेंबर २०२३ रोजी पोलिसांकडून लाठीहल्ला झाला होता. त्यानंतर मनोज जरांगे निघून गेले होते, परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्यांना पुन्हा आणून बसवले, असा दावा भुजबळ यांनी केला आहे.
या लोकांनी पवार साहेबांना तिथे बोलावले. मग पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. खरी माहिती जी आहे. त्याची त्या दोघांना कल्पना नव्हती, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.