26.4 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeलातूरअकरा महिन्यांत ८४३ विवाहांची नोंदणी

अकरा महिन्यांत ८४३ विवाहांची नोंदणी

लातूर : प्रतिनिधी
आधार कार्ड, पोडगी, विविध शासकीय योजनांसह अन्य कामांसाठी विवाह नोंदणी करुन विवाहाचे प्रमाणपत्र काढण्याकडे लातूर शहरातील जोड्यांचा कल वाढला आहे. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांत ८४३ विवाह नोंदणी झाली असून डिसेंबरअखेर हा आकडा एक हजाराच्या पुढे जाईल, असे संबंधीत विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
लातूर शहर महानगरपालिकेच्या विवाह नोंदणी कार्यालयात विवाह केलेल्या जोड्यांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. विवाह झाल्यानंतर कायदेशीरबाबींकरीता तसेच विविध शासकीय योजनांकरीता विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्यामुळे विवाह नोंदणीकडे जोडप्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या विवाह नोंदणी कार्यालयात विवाह नोंदणीचा परिपुर्ण अर्ज दिल्यानंतर लगेच दुस-या दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची सोय असल्यामुळे विवाह केलेल्या जोडप्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र तत्काळ मिळत आहे.
अमेरिका, फिलिपिन्स, जपान, लंडन आणि अन्य देशांमध्ये नोकरीस असलेल्या लातूरच्या जोड्यांनाही विवाह नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता भालस्याने ही जोडपी विदेशातून लातूरला येऊन अवघ्या काही तासांत विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जात आहेत. पती विदेशात नोकरीला असले आणि पत्नीला विदेशात घेऊन जायचे असे तर त्यासाठी आवश्यक पासपोर्ट, व्हीजाकरीता विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे विदेशातील पती आपल्या पत्नीसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव करुन विवाहन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेत आहेत.
 लगनाचे प्रमाणपत्र अधिकृत कागदपत्र म्हणून कायदेशीर प्रकरणात वापरले जाते. प्रमाणपत्राद्वारे वडिलोपार्जित मालमत्तेर दावा करण्यास मदत होते. कायदेशीर हक्कासाठी लढता येते.  मुलांचा कायदेशीर ताबा मिळविण्यासाठी तसेच पासपोर्ट सेवा, रहिवासी दाखला मिळविण्यासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग होतो. लग्नाचा भक्कम कायदेशीर पुरावा मानला जातो. त्यामुळेच गेल्या अकरा महिन्यांत लातूर शहरातील ८४३ जोडप्यांनी विवाह नोंदणी प्रमाणापत्र काढले आहेत. गतवर्षी १०९७  जोडप्यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR