जाणकारांना, तज्ज्ञांना चित्रपट दाखवावा;  उदय सामंतांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेता विकी कौशलचा बहुचर्चित सिनेमा ‘छावा’ वादाच्या भोव-यात सापडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणा-या विकी कौशलच्या डान्सवर शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करत आक्षेपार्ह दृश्य वगळण्याची मागणी केली आहे. आता या संदर्भात महायुती सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी ‘छावा’ चित्रपट इतिहासतज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी सरकारची भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ‘छावा’ सिनेमा रिलीज होण्याआधीच वाद पेटण्याची शक्यता आहे. मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून म्हटले आहे की, धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.

त्याशिवाय महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने याबाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी निर्मात्यांना दिला आहे.

संभाजी महाराजांचा इतिहास समोर आणण्यासाठी अनेकांचे फार मोठे योगदान आहे. करमणूक आणि व्यावसायिकासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समोर आणून त्यात वाद होऊ नयेत. महापुरुषावर आपण सिनेमा करतो, तर त्यात केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहता येत नाही असे सांगत अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उदय सामंत यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूर–जहीराबाद महामार्गावर खळबळ! पोत्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
01:26
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये HomeLane च्या पहिल्या Experience Centre चं उद्घाटन | AI Home Interiors
08:24
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ६२% मतदान | ४१ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत
01:36
Video thumbnail
Nanded News|नांदेडमध्ये चारा तस्करी उघड! दोन ट्रक जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
04:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘लखन मेकअप’चं शानदार उद्घाटन | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
02:50
Video thumbnail
Latur Graduate Constituency Election | दुपारी १२ पर्यंत १९.३३% मतदान | Latur News
06:48
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये जबरदस्ती कर्जवसुलीविरोधात भीम आर्मी आक्रमक
03:39
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात उदगीरमध्ये २५ तारखेला एल्गार आंदोलन
03:05
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये घरेलू महिला कामगारांचा एल्गार! विविध मागण्यांसाठी गांधी चौकात धरणे आंदोलन
06:46
Video thumbnail
Latur News|दुष्काळात हसेगावच्या सेवालायाचा पुढाकार! १०० गायींच्या संगोपनासाठी गो-सेवालय
07:47
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Parbhani News|ताडकळसमध्ये हरणाच्या पाडसावर कुत्र्यांचा हल्ला; शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मदत
01:18
Video thumbnail
Nanded News|आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोहित पवारांचा आधार
05:38
Video thumbnail
Latur News|निलंगेकर बंधूंवर अभय साळुंके यांचा गंभीर आरोप! विक्टोरिया कंपनी प्रकरणाची कागदपत्रे सादर
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44

Latest news