28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

मुंबई : विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक, विक्रमी महाविजय नोंदवत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने महाराष्ट्रातील सत्ता दणदणीत बहुमताने पुन्हा हस्तगत केली असून, सोमवारी किंवा मंगळवारी नव्या सरकारचा शपथविधीदेखील होऊ घातला आहे. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची निवड करण्यात आहे.

थेट बँक खात्यात महिना १५०० रुपयांची ओवाळणी जमा करणा-या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने महाविकास आघाडीचा सारा खेळ खल्लास केल्याचे स्पष्ट चित्र आहे. या निवडणुकीत महिलांच्या मतदानात ७ टक्के वाढ झाली आणि हे बहिणींच्या मतांचे दान थेट महायुतीच्या पदरात पडले.

‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ हा नारा देत महायुतीने दिलेली हिंदू एकजुटीची हाकदेखील राज्यभर मोठा परिणाम साधणारी ठरली. परिणामी, १४५ हा बहुमताचा जादुई आकडा मागे टाकत महायुतीने थेट २३५ जागांवर झेप घेत आपली सत्तेवरची पकड मजबूत केली. यात १३२ जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने आजवरचा सर्वाधिक जागांचा उच्चांक नोंदवला. खालोखाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ आमदार निवडून आणले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR