हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल लपवून हिजबुल्लाचे कंबरडे मोडणा-या इस्रायलवर हिजबुल्लाने मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्त्रायलची आयर्न डोम सिस्टिम सपशेल फेल ठरली असून नागरिकांना बंकरमध्ये आसरा घ्यावा लागला आहे.

इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. इस्रायलवर १०० हून अधिक रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले. रविवारी सकाळी जेझरील खो-यात १४० हून अधिक रॉकेट आणि ड्रोन डागण्यात आले. हैफा, नाझरेथ, अफुला, लोअर गॅलीलीसह अन्य भागांमध्येही हल्ला करण्यात आला. इस्त्रायलची आयर्न डोम यंत्रणा हे हल्ले थोपविण्यास असमर्थ ठरल्याने नागरिकांना बंकरमध्ये आसरा घ्यावा लागला आहे. हिजबुल्लाह दहशतवादी आमच्या नागरिकांना लक्ष्य करत आहेत, असे आयडीएफने एक्सवर म्हटले आहे.

रात्रभर रॉकेट अलर्ट सायरन वाजत होते. या हल्ल्यानंतर इस्रायलनेही हिजबुल्लाहला जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. इस्रायलने डागलेल्या रॉकेटमध्ये एक रॉकेट शाळेवर पडले. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. धमक्या आम्हाला थांबवणार नाहीत. आम्ही सर्व लष्करी शक्यतांचा सामना करण्यास तयार आहोत, असे हिजबुल्लाहच्या डेप्युटी कमांडरने म्हटले आहे.

इस्रायलबरोबरच्या संघर्षाच्या नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे असे त्याने म्हटले आहे. बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांवर शुक्रवारी इस्रायली हल्ल्यात मारल्या गेलेल्या सर्वोच्च कमांडरच्या अंत्यसंस्कारानंतर हिबुल्लाहने हा हल्ला केला आहे. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये सुमारे १३० किलोमीटरची सीमा आहे. हमासमुळे गाझा पट्टी उध्वस्त झाली आहे. आता हिजबुल्लाहमुळे लेबनान हा देश उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. इस्रायलच्या तुलनेत लेबनान कुठेच नाही आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21

Latest news