34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रअज्ञात वाहनाच्या धडकेत ३ मजूर ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत ३ मजूर ठार

जळगाव : प्रतिनिधी
जळगावजवळच्या नशिराबाद येथे पुलाच्या ठिकाणी झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नशिराबाद गावाजवळ पुलाच्या ठिकाणी परप्रांतीय मजूर रात्री झोपलेले असतानाच एक अज्ञात वाहन काळ बनून आले.

दरम्यान, जळगावजवळच्या नशिराबाद येथे पुलाच्या ठिकाणी झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नशिराबाद गावाजवळ पुलाच्या ठिकाणी परप्रांतीय मजूर रात्री झोपलेले असतानाच एक अज्ञात वाहन काळ बनून आले आणि त्याने चिरडल्याने तिघांचा हकनाक बळी गेला. मंगळवारी पहाटे ही दुर्दैवी घटना उघडकीस येताच एकच कल्लोळ माजला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचा-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पंचनामा करून त्यांनी तिघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी पाठवले. दरम्यान या घटनेबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावजवळच्या नशिराबाद नजीक असलेल्या खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रोडचे काम सुरू आहे. तेथे अनेक मजूर रात्रंदिवस घाम गाळून काम करत असतात. काल नेहमीप्रमाणे दिवसभर काम केल्यावर काही मजुरांनी रस्त्याच्या कडेलाच अंग टाकले. दमले-भागलेले ते जीव गाढ झोपेत होते, पण सकाळी उठलेच नाहीत. रस्त्याच्या शेजारी असलेल्या पुलावर ते झोपले होते. मजूर झोपलेले असताना अंधारात काही न दिसल्याने अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत झालेले हे तीनही मजूर परप्रांतीय होते,

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR