37.6 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeराष्ट्रीयअतिरेकी हल्ल्यात २७ पर्यटक ठार

अतिरेकी हल्ल्यात २७ पर्यटक ठार

काश्मिरात पर्यटकांवर भ्याड हल्ला, घटनास्थळी रक्ताचा सडा
पहलगाम : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला तर २ डझनहून अधिक पर्यटक जखमी झाले आहेत. ७ ते ८ दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट करत थेट गोळीबार केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसेच त्यांनी धर्म विचारून गोळ््या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले असून, हल्लेखोरांना सोडणार नाही, असा इशारा दिला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने आलेले होते. यामध्ये गुजरात, तामिळनाडू, उडिसा, महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश होता. आज पोलिसांच्या वेशात तिथे अतिरेकीआले आणि त्यांनी थेट जात विचारून पर्यटकांवर बेछूट गोळीबार सुरू केला. या भ्याड हल्ल्यात तब्बल २७ पर्यटक मृत्युमुखी पडले असून, ८ ते १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन विदेशी नागरिक आणि दोन महाराष्ट्रीय आहेत. दरम्यान, जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी अक्षरश: रक्ताचा सडा पडला होता. या घटनेने देश हादरला आहे.

दहशतवाद्यांनी एका मागून एक पर्यटकांना टार्गेट केले. २००६ नंतरचा जम्मू-काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगितले जाते. अर्थात गेल्या दोन दशकांत काश्मीरमधील पर्यटकांवर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. हा भ्याड हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. या हल्ल्यात सहभागी असणा-यांना सोडले जाणार नाही, असे अमित शहांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संवेदना व्यक्त करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.

सैनिक तैनात, यंत्रणा सतर्क
या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला, त्या भागात सैनिक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, या हल्ल्यात जखमींवर उपचार सुरू असून, अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू
दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. यात दिलीप डिसले आणि डोंबिवलीचे अतुल मोने आणि संजय मोने यांचा समावेश आहे. अतुल मोने हे डोंबिवलीतील रहिवासी आहेत. मोने हे पत्नी आणि मुलीसह फिरण्यासाठी गेले होते. मोने यांच्यासोबत डोंबिवलीतील हेमंत जोशी आणि संजय लेले हेही कुटुंबासह गेले होते. यासोबत पुण्यातील जगदाळे पती-पत्नी आणि गणबोटे दाम्पत्यही आहे. यात संतोष जगदाळे, कौस्तुब गणबोटे जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR