28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeपरभणीअत्याधुनिक शिक्षणासाठी क्लासरूम आवश्यक : खा. फौजिया खान

अत्याधुनिक शिक्षणासाठी क्लासरूम आवश्यक : खा. फौजिया खान

परभणी : विद्यार्थ्यांना आधुनिक साधनाचा वापर करून त्यामधून आजच्या तोडीचे शिक्षण मिळावे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्ह्यातील इतरही शाळांना सीएसआर फंड मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खा. फौजिया खान यांनी केले.

जिल्ह्यात नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून शाळेत येत असलेल्या विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्द पाणी मिळावे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक पद्धतीत व्हावा याकरिता खा. फौजिया खान यांनी सीएसआर फंड मिळण्याकरिता वेगवेगळ्या संस्थांकडे प्रयत्न केले. त्यामधून बीपीसीएल व ओएनजीसी या कंपनीने परभणी जिल्ह्यात ६ शाळांमध्ये डिजिटल क्लासरूमचे साहित्य तसेच या शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्याकरिता आरो फिल्टर मशीन बसविण्यास मान्यता दिली. या सत्राच्या सुरुवातीस या डिजिटल क्लासरूमचा तसेच पिण्याचे पाण्याचे आरो सिस्टीमचा लोकार्पणाचा कार्यक्रम दि.१९ रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी शाळेत संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी (प्रा) सुनील पोलास होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी (मा) श्रीमती आशा गरुड, शिक्षणाधिकारी (योजना) ससाने व शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मुख्याध्यापक माने, गटशिक्षणाधिकारी परभणी तसेच जावेद शेख व मोहसीन खान यांनी अथक परीश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR