16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरअधिकारी बदलला की, प्रयोग बदलले लाखो रुपये वाया गेले

अधिकारी बदलला की, प्रयोग बदलले लाखो रुपये वाया गेले

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गंजगोलाई परिसरातील १६ रस्त्यांना जोडणा-या २४ उपरस्त्यांवरील सुमारे ३५० लोखंडी बॅरिगेटींग काढून टाकले. कोरोना काळात लावलेल्या या बॅरिगेटींगमुळे वाहतूकीवर ब-यापैकी नियंत्रण आणता आले होते. परंतू, मनपा प्रशासनाने ३ वर्षांनंतर हे लोखंडी बॅरिगेटींग काढून टाकले. अधिकारी बदलला की, प्रयोग बदलले. त्यात महानगरपालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान मात्र झाले.

पाच वर्षांपुर्वी म्हणजे २०१९ च्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभर पसरला होता. लातूर शहरही त्यास अपवाद नव्हता. गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हे कोरोना प्रतिबंधावरील उपाय होते. त्यामुळे शहरातील अनावश्यक गर्दी टाळता यावी, या हेतूने लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गंजगोलाई परिसरातील १६ रस्त्यांना जोडणा-या उपरस्त्यांवर मार्च २०२० मध्ये लोखंडी बॅरिगेटींग करण्यात आली होती. या बॅरिगेटिंगमुळे अनावश्यक गर्दीवर बराचसा आळाही बसला होता. परिणामी कोरानाचा वाढता प्रादुर्भावही रोखता आला होता. या बॅरिगेटींगमुळे अरुंद रस्त्यांवर वाहने जात नव्हती. वाहतूक कोंडी होत नव्हती. परंतू, तीन वर्षांनंतर मनपा प्रशासनाने हे सुमारे ३५० बॅरिगेटींग काढून टाकले. अधिकारी बदलला की प्रयोग बदलले आणि त्यात मनपाचे मात्र लाखो रुपये वाया गेले.

गंजगोलाईतील मेन रोड, लोखंडगल्ली, सराफ लाईन, जुनी सराफ लाईन, शिवाजी रोड, घंटे लॉजजवळील रोड, बाटा शो रुमजवळचा रोड, त्याला लागुन असलेला रोड, गोलाईच्या पुर्वेकडील रोड, भाजी मंडईतील तीन रोड, मस्जिद रोड, जुनी कापड गल्ली, भूसार लाईन, कापड लाईन अशा १६ रस्त्यांना अंतर्गत जोडणा-या जवळपास ३५० रस्त्यांवर मार्च २०२० मध्ये लातूर शहर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त यांनी लोखंडी बॅरिकेटींग केली होती. त्यावर सुमारे २८ ते ३० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. कोरोनामुळे अनवाश्यक गर्दी रोखण्यासाठी ही बॅरिगेटींग करण्यात आली होती. गेल्या तीन-चार वर्षांत अंतर्गत रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहने जात नव्हती. त्यामुळे वाहतूक कोंडी न होता त्या त्या रोडवरील व्यवसाय चालत होता. नागरीकांनाही या बॅरिगेटींगची सवय झाली होती. परंतू, अचानकपणे हे लोखंडी बॅरिगेटींग काढून टाकण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR