22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरअधिकारी स्वागतात मग्न तर उच्चपदस्थ अधिकारी कर्तव्यावर दक्ष

अधिकारी स्वागतात मग्न तर उच्चपदस्थ अधिकारी कर्तव्यावर दक्ष

लातूर : विनोद उगीले
लोकसभा निवणूकीच्या अनुषंगाने तर निवडणूक आयोगाच्या निकषानुसार लातूर शहरातील गांधी चौक व विवेकानंद चौक पोलीस ठाण्यातील नुतन अधिका-यांच्या बदल्या झाल्या व या पोलीस ठाण्यांचा नुतन पोलीस अधिका-यांनी गुरूवारी रात्रीला ठाण्याचा आपला पदभार घेतला. एकीकडे या क्षणाला ठाण्याच्या कर्मचा-याकडून जल्लोषात अतिषबाजीत स्वागत होत असतानाच दुसरीकडे लातूरात नव्यानेच दाखल झालेल्या वरिष्ठ प्रशिक्षणार्थी अधिका-यांनी या पोलीस ठाण्याच्या  हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उगारत त्याचे स्वागत केले आहे.
    होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने व निवडणूक आयोगाच्या निकषानुसार दोन दिवसापुर्वी जिल्ह्यातील १२ पोलीस ठाण्याच्या कारभार सांभाळणा-या पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांना बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षांचे आदेश असल्याने या पैकी बहुजांश पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक आपला पदभार घेण्यात व्यसत होते. या प्रमाणेच लातूर शहरातील गांधीचौक व विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात कर्मचारी आपल्या नुतन पोलीस   निरिरूकांच्या स्वागतात व्यसत होते. हार तुरे फटाक्याच्या आतीषबाजीने स्वागत होत होते. असे असताना मात्र जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाहेर राज्यातून आलेल्या परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर लातूर शहरातील विवेकानंद व गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळया ठिकाणी छापा मारून पत्त्यावर तिर्रट जुगार खेळणारे व खेळवणा-या इसमावर कारवाईचा बडगा उगारत नुतन पोलीस निरिक्षकांचे स्वागत करण्यात आले.
   एक फेब्रुवारी व दोन फेब्रुवारी रोजी पोलीस ठाणे विवेकानंद चौक व गांधीचौक हद्दीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये,तसेच रूम मध्ये काही इसम पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहेत अशी माहिती मिळाली. त्यावरून परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी मळवटी गावात, लायक शेख यांचे शेतात तसेच कोल्हे नगर,लातूर येथील अजित देशमुख यांच्या घरात  छापेमारी करून बेकायेशीररित्या पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आलेल्या एकूण  २५ इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ६ लाख ८ हजार ६०० रुपयाचा मुद्ये माल जप्त केला आहे. या नुतन पोलीस निरिक्षकांच्या ठाण्यातील अतिशबाजीतील स्वागताची तर याच ठाण्यातील हद्दीतील परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईची सर्वत्र चवीने चर्चा सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR