30 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeमहाराष्ट्रअन्त्यदर्शनाला जाणा-यांच्या गाडीला भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

अन्त्यदर्शनाला जाणा-यांच्या गाडीला भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

गोंदिया : जैन धर्मीयांचे दिगंबर पंथीयाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे रात्रीच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी जाणा-या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत.

जैन धर्मीयांचे दिगंबर पंथीयांचे सर आचार्य विद्यासागर महाराज यांचे छत्तीसगडच्या डोंगरगड येथे रात्री २ वाजून ३५ मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. मध्य प्रदेश राज्यातील रिवा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या डोंगरगडकडे भाविक संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अन्त्यदर्शनला निघाले होते. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पानगाव येथे गाडी अनियंत्रित झाल्याने पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये कोसळली.

बुडून झाला मृत्यू
अन्त्यदर्शनाला जाणा-या भाविकांची गाडी गोंदियाच्या पानगाव येथे पुजारीटोला धरणाच्या कालव्यात कोसळली. दरम्यान कालव्यामध्ये पाणी असल्याने पाण्यात बुडून गाडीतील तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तर अन्य तिघे भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR