31.6 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रअब्दुल सत्तारांविरोधात याचिका दाखल

अब्दुल सत्तारांविरोधात याचिका दाखल

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांचा विजय हा वादाच्या भोव-यात सापडला आहे. ते सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात अवघ्या २,४२० मतांनी निवडून आले होते. पण, त्यांच्या या विजयावर आता शंका उपस्थित करण्यात आली आहे. निवडणूक अधिका-याला हाताशी धरत सत्तारांनी निकाल फिरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात एक याचिकादेखील दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता खंडपीठाने गृह विभागाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात खोटी आणि चुकीची माहिती देत, निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिल्लोड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये याप्रकरणी त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच सीआयडी चौकशीनंतरही अब्दुल सत्तारांच्याविरोधात कारवाई करण्यास विलंब केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने राज्याच्या गृह विभागाला नोटीस बजावली. या संदर्भात १२ डिसेंबरपर्यंत बाजू मांडण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आता नव्या सरकारमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांना स्थान मिळणार की नाही? यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांआधी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील तब्बल ५५० कोटी रुपयांच्या भराडी निम्न प्रकल्पाला स्थगिती दिली. त्यानंतर आता २०११ ते २०१९ या दरम्यान अब्दुल सत्तारांनी आमदार निधीचा गैरवापर करत स्वत:च्याच संस्थेच्या शाळा बांधल्या प्रकरणी कारवाईस विलंब का? अशी विचारणा करणारी नोटीस देखील खंडपीठाने गृह विभागाला दिली. त्यामुळे आता त्यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR