अभिनेते रितेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘पाच फुटाचा बच्चन’चा ट्रेलर लाँच

मुंबई : प्रतिनिधी
कीर्तनातून प्रसिद्धीस आलेल्या एका तरुणीची गोष्ट सांगणा-या ‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या टीजरला भरभरून मिळालेल्या प्रतिसादानंतर आता ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी आणखी उत्सुकता निर्माण झाली असून, हा चित्रपट ९ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे.

‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटात तरूण कीर्तनकार मुलीची गोष्ट आहे. तिच्या कीर्तनात कोल्हापुरी भाषा आहे. संतांचे अभंग तिला मुखोद्गत आहेत. जनमानसात तिचे प्रचंड नाव आहे. उंचीने पाच फूट असलेल्या या तडफदार मुलीला ‘पाच फुटाचा बच्चन’ म्हणून ओळखलं जातं. या प्रमुख भूमिकेतून श्रुती मधुदीप ही अभिनेत्री पदार्पण करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. यात तगड्या कलाकारांची फौज आहे.
अवघ्या अडीच मिनिटाचा हा ट्रेलर अत्यंत नाट्यमय असून त्यातील दृश्यांनी प्रेक्षकांची मने खिळवून ठेवली आहेत. या चित्रपटात नेमके काय घडणार आहे, याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख म्हणाले, बच्चनच्या बाजूला उभे राहणं मग ते सहा फुटाचा असो किंवा पाच फुटाचा मला ही थोडी धाकधूक होती. महाराष्ट्राची संस्कृती जपणारा, पुरोगामी विचार पुढे घेऊन जाणारा हा ‘पाच फुटाचा बच्चन’ चित्रपट आहे हे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते. पहिला चित्रपट जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपल्याला माहित नसत की तो कसा होतो आहे पण महत्वाचे असत ते आपल्याला मिळणारी लोकांची साथ जी अतिशय महत्वाची असते आणि मला वाटत की तुम्हाला ती लाभली आहे.

राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज यांनी पाच फुटाचा बच्चन या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात श्रुती मधुदीप, गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, पुष्कराज चिरपुटकर, आशय कुलकर्णी, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील, विनोद वणवे यांच्या भूमिका आहेत. अभिषेक शेटे यांनी छायांकन, सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन, निरंजन पेडगावकर यांनी संगीत, तर प्रदीप आवटे यांनी गीतलेखनाची जबाबदारी निभावली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43
Video thumbnail
Latur|लातूरच्या गांधी मार्केट येथील इलेक्ट्रिक वास्तूच्या दुकानाला भीषण आग#Latur #fire
00:30
Video thumbnail
Latur|लातूर शहरात खुलेआम दादागिरी; चायनीज सेंटरमध्ये दुचाकी घुसवून नासधूस
00:39
Video thumbnail
Latur|लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! विद्यार्थिनीचा विनयभंग;संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
01:15
Video thumbnail
Latur|एकर सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त; केळगावच्या शेतकऱ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय
03:28
Video thumbnail
Latur|लातूर पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले ५१ मोबाईल मूळ मालकांना परत
03:43
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथ गावात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
03:21
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीला गेलेले ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत
02:20

Latest news