26.5 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रअमरावतीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बिघडली

अमरावतीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बिघडली

अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील गोल्डन फायबर कंपनीत १०० पेक्षा अधिकच्या कामगारांना अचानक विषबाधा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात अनेक महिलांना उलट्यांचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. घटनेची माहिती मिळताच यातील रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मात्र ही विषबाधा नेमकी कशी आणि कशातून झाली हे अद्याप कळू शकलेले नसले तरी त्या दिशेने तपास सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR