20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeलातूरअमित देशमुख यांनी प्रचारात घेतली आघाडी

अमित देशमुख यांनी प्रचारात घेतली आघाडी

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळाल्याने महाविकास आघाडी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांची नामांकन अर्ज मिरवणूक व प्रचार शुभारंभ सभा ऐतिहासिक झाली. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिल्याने ते मराठवाड्यासह राज्यात विविध ठिकाणी जाऊन महाविकास आघाडीसाठी प्रचार सभा घेत आहेत.
लातूर शहरात प्रत्येक प्रभागात स्नेह भेट कार्यक्रम, रॅली मोठमोठ्या प्रचार सभेला ते उपस्थित राहतात. महाविकास आघाडी काँग्रेसच्या सर्व प्रचार सभा, पदयात्रा, कॉर्नर बैठक, रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, ट्वेंटीवन अ‍ॅग्रीच्या संचालिका अदिती अमित देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात जाऊन पदयात्रा, रॅली, कॉर्नर बैठका, प्रचार सभा घेऊन लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघात केलेली विकास कामे, अडीच वर्षातील महाविकास आघाडी सरकारचे काम, महाविकास आघाडी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची माहिती मतदारांना देऊन महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार अमित विलासराव देशमुख यांना जनतेची सेवा पुन्हा करण्यासाठी विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन ते करत आहेत.
महाविकास आघाडी काँग्रेसचे लातूर शहरात ठीकठिकाणी मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडीला मतदान करण्याच्या आवाहनाचे होर्डिंग्स लागल्या आहेत. महाविकास आघाडी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते डोअर टू डोअर मतदारांच्या घरी जाऊन लातूर शहर विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांचे माहिती पत्रक व महाविकास आघाडी काँग्रेसचा जाहीरनामा मतदारांना देत आहेत. लातूर शहरातील वातावरण महाविकास आघाडी काँग्रेसमय झाले आहे तर आतापर्यंत विरोधक भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडीची कुठलीही मोठी प्रचार सभा पदयात्रा झाल्या नाहीत त्यामुळे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी प्रचारात लक्षणीय आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR