16.3 C
Latur
Tuesday, January 6, 2026
Homeलातूरअमेरिकेची अमानवीय कृती; केंद्राच्या निष्क्रियतेविरोधात लातूर काँग्रेसची निदर्शने

अमेरिकेची अमानवीय कृती; केंद्राच्या निष्क्रियतेविरोधात लातूर काँग्रेसची निदर्शने

लातूर : प्रतिनिधी
अमेरिकेतील भारतीय नागरिकांवर होत असलेल्या अमानवीय वर्तनाचा आणि त्यांना देशाबाहेर काढण्याच्या प्रक्रियेचा निषेध म्हणून लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने काँग्रेस भवन लातूर समोर अमेरिका आणि  भारत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकारच्या मौन आणि निष्क्रियतेवरही जोरदार टीका करण्यात आली.
लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे  अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी  अमेरिकेच्या सरकारवर भारतीय नागरिकांना गैरवर्तन, अपमानजनक पद्धतीने डिटेन करून देशाबाहेर फेकण्याचा आरोप केला. अमेरिकेतील भारतीय समुदायाच्या प्रतिष्ठेला धक्का लागत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करावा, असे मत यावेळी त्यांनी  निदर्शनादरम्यान व्यक्त केले. त्यांनी भारत सरकारवर अमेरिकेशी कडक भूमिका घेऊन प्रवासी भारतीयांच्या हक्कांच्या रक्षणासाठी राजनैतिक दबाव आणण्याची मागणी केली.
यावेळी गोरोबा लोखंडे, रविशंकर जाधव, सुभाष घोडके, अ‍ॅड.फारुख शेख, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, इम्रान सय्यद,आयुब मणियार, दगडू अप्पा मिटकरी, असिफ बागवान, कैलास कांबळे, शरद देशमुख,प्रा.सुधीर आनवले, अफसर कुरेशी,विजयकुमार साबदे, अ‍ॅड. गणेश कांबळे, बब्रुवान गायकवाड, पिराजी साठे, यशपाल कांबळे, पवनकुमार गायकवाड, काशिनाथ वाघमारे, प्रमोद जोशी, सुलेखा कारेपूरकर, शितल मोरे, फारुक शेख,धनंजय गायकवाड, धनंजय शेळके, विजय गायकवाड, करीम तांबोळी, राजु गवळी, नितीन कांबळे, दयानंद कांबळे, करण गायकवाड, भाऊसाहेब भडीकार, अ‍ॅड. अंगद गायकवाड,अमोल गायकवाड, नानासाहेब डोंगर अभिजित एगे, अभिषेक पतंगे, बालाजी झिपरे, आकाश मगर, खाजापाशा शेख, युसुफ शेख,सत्यवान कांबळे, मैनोदीन शेख  यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR