39.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

वर्धा : प्रतिनिधी
एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीला तिचाच अल्पवयीन मित्र आपल्या घरी घेऊन गेला होता.
तिथे त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर घटनास्थळी आलेल्या चार जणांनी देखील अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. १० फेब्रुवारीला सोमवारी सकाळी पीडितेचा अल्पवयीन मित्र तिला घेऊन आपल्या घरी गेला होता. घरी गेल्यानंतर त्याने पीडितेवर जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपीचे चार मित्र घरी आले. त्यांनी अल्पवयीन मुलाला घराबाहेर पाठवून पीडित मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. अत्याचारानंतर मित्र पीडित मुलीला घरी सोडून आला.

या घटनेनंतर रात्री पीडित मुलीची आई कामावरून घरी आली असता, पीडितेने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर आईने तातडीने आर्वी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाचही आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR