25.9 C
Latur
Thursday, October 23, 2025
Homeलातूरअष्टविनायक मंदिरात आज दिवाळी पहाट

अष्टविनायक मंदिरात आज दिवाळी पहाट

लातूर : लातूर अर्बन बँकेच्या वतीने आज दि. १ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ८ या वेळेत दीपोत्सव व संगतीत समारोहाचे आयोजन येथील अष्टविनायक मंदीरात करण्यात आले आहे. संगीत समारोह कार्यक्रमासाठी केरळ येथील युवा गायिका भारत की बेटी सूर्या गायत्री याचे गायन होणार आहे. याच कार्यक्रमात चेन्नई येथील प्रसिद्ध जिओश्रेड हे अत्याधुनिक आयपॅडवरील वाद्य वाजविणारे प्रसिद्ध कलावंत महेश राघवन, चेन्नई येथील प्रसिद्ध व्हायोलिन वादक श्रावण श्रीधर, तबलावादक तनय रेगे, कीबोर्ड वादक कौशिक जोगळेकर व केरळ येथील मृदंग वादक अनिल कुमार येणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रमण मालु, आकाश राठी, शुभदा रेड्डी, अभय शहा, नवनीत भंडारी, नरेश सूर्यवंशी, सोनाली ब्रिजवासी, प्रा. शशिकांत देशमुख, डॉ. संदीप जगदाळे आदींनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR