अहमदपूर : प्रतिनिधी
येत्या २० नोव्हेंबर रोजी होणा-या अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून या मतदारसंघात ३ लाख ४७ हजार ४५४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी ३७६ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ.मंजुषा लटपटे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर त्यांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून येथील तहसीलदार उज्वला पांगरकर व चाकूरचे तहसीलदार नरंिसग जाधव व नायब तहसीलदार संतोष अनर्थे, संजय भोसीकर, एम.ए. मुजावर, संतोष धाराशिवकर, अभिलाष जगताप, एस.आर. जवादे, एन.बी. अर्जूने, प्रल्हाद रिठे हे सहकार्य करणार आहेत. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात १ लाख ९५ हजार, ६९५ एकूण मतदार संख्या आहे. पुरुष मतदार संख्या १ लाख २१ हजार ९९ तर महिला मतदार संख्या ९३ हजार ५२५, चाकूर मतदारसंघात १ लाख ५१ हजार ७३० एकूण मतदार संख्या आहे. पुरुष मतदार संख्या ७९ हजार ६०५ तर महिला मतदार संख्या ७२ हजार१२४ एकूण मतदार १ लाख ५१ हजार ७३० असे अहमदपूर -चाकूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ४७ हजार ४५४ मतदार आपला मतदानाचा हक्क ३७६ मतदान केंद्रांवर बजावणार आहेत.
तालुक्यात चार ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले असून त्यासाठी पोलीस प्रशासन ही सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बॅनर, स्वागताच्या कमानी, नगरपालिका कर्मचा-यांंनी तत्काळ हटवून रस्ते मोकळे केले आहेत. निवडणुकीची सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.मंजुषा लटपटे यांनी दिली. यावेळी अहमदपूर -चाकूर मतदारसंघात ३ लाख ४७००० मतदार मतदानाचा हक्क एकूण ३७६ केंद्रावर बजावणार आहेत.