22.3 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरअहमदपूर येथील नगरपालिकेचा ढिसाळ कारभार

अहमदपूर येथील नगरपालिकेचा ढिसाळ कारभार

अहमदपूर : प्रतिनिधी
शिक्षणाची पंढरी म्हणून नावरुपाला आलेल अहमदपूर शहर आहे मात्र नगर पालिकेच्या प्रशासनाच्या  ढिसाळ आणि मनमानी कारभारामुळे शहराला अस्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा, शहराची स्वच्छता केली जात नाही, आणि काही भागात रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. म्हणून उबाठा शिवसेनेच्या वतीने प्रभारी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
     पावसाळ्यापूर्वी शहरातल्या मुख्य नाल्या साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी सर्व घाण रस्त्यावरून वाहत असुन त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. डेंगू, मलेरिया सारख्या आजाराला समोर जावं लागण्याची वेळ शहरातील नागरिकांवर येणार आहे. जागोजागी कचरा साचलेला दिसत आहे. शहरातील पथदिवे ही बंद राहतात, मोकाट जनावरे चक्क रस्त्यावर बसून राहतात वरील सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
 यापूर्वी कार्यालयात असलेले मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे असताना त्यांच्या कार्यकाळात चार दिवस आड नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा, व शहरातील स्वच्छतेकडे जातीने लक्ष देऊन वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करून अहमदपूर शहराला स्वच्छ व सुंदर करण्याचे काम केले होते. नगरपरिषदेमधील कर्मचा-यांना शिस्त लावण्याचे काम खूप चांगले केले होते. त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा अहमदपूर वासियांना सार्थ अभिमान आहे. आता नागरिकांना प्रश्न पडतोय की मुख्याधिकारी डोईफोडे यांच्या कार्यकाळात सर्व कामे अगदी व्यवस्थित, वेळेत होत होती आता का होत नाहीत. सध्या येथील नगरपरिषदेमध्ये प्रभारी मुख्याधिकारी असून येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्याची मागणी ही करण्यात आली आहे.
या शहरातील नागरिकांना शहराला फिल्टर युक्त पाणीपुरवठा करावा व शहरातील नाल्याचे नियमित साफसफाई करून सादरील घाण तात्काळ उचलून घेण्यात यावी शहरातील बंद असलेले पथदिवे ही चालू करण्यात यावेत अशा पध्दतीचे निवेदन देण्यात आले आहे. ही कामे मार्गी नाही लागल्यास जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नागरिकांच्या न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.  निवेदनावर शिवसेना उपशहर प्रमुख शिवकुमार बेद्रे, युवा सेना प्रमुख अजय सुरनर,  कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, ज्ञानेश्वर मेकले, अजय तिडोळे, सोपान हाके, ज्ञानेश्वर मस्के, राजू श्रीरामे, शरद पेंडलवार, हैदर मुजवार, सचिन उखाडे, शेख फारुख, यांच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR