27.8 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरअहमदपूर येथे वनपरिक्षेत्र कार्यालयात मनसेचा ठिय्या

अहमदपूर येथे वनपरिक्षेत्र कार्यालयात मनसेचा ठिय्या

अहमदपूर : प्रतिनिधी
अहमदपूर आणि चाकूर येथे वनविभागात कार्यरत असलेल्या २५ ते ३० कामगार मजुरांचा पगार अनेक महिन्यांपासून थकित राहिला आहे. त्यांची दिवाळीही गोड झाली नाही. मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरंिसंह भिकाणे यांच्याकडे मजुरांनी कैफितय मांडली असता त्यांनी मजुरांसह अहमदपूर वनविभागात धडकत वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या कार्यालयात ठिय्या आंंदोलन केले. शेवटी या मजुरदार कामगारांचा पगार लवकरच करण्याचे अधिकारी यांनी शब्द दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आपेट यांना जाब विचारण्यात आला. तब्बल एक तास अपेट यांना प्रत्येक मजुराला अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. हे सर्व अनेक नेत्यांकडे गा-हाणे करीत फिरले पण त्यांचा पगार झाला नाही. डॉ भिकाणे यांनी घटनेचा निषेध करीत अचानक आक्रमक भूमिका घेतली आणि तुम्हाला मनसे स्टाईल धडा शिकवावा लागेल असा इशारा देताच संवेदनशील वनरक्षक अधिकारी माळी व मस्के यांनी मजुरांचा पंधरा दिवसांत पगार करू, अशी भूमिका घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी अपेट यांनी डॉ भिकाणे यांना आश्वासन दिले. त्यानंतर डॉ भिकाणे यांनी ठिय्या आंदोलन संपवले . यावेळी अधिका-यांनाही ऑन कॅमेरा मजुरांना पंधरा दिवसांत पगार करू असे सांगण्यास सांगितले. हे ऐकताच सर्व वनकामगारांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

यावेळी मनसे तालुकाउपाध्यक्ष उत्तम पाटील, चंद्रशेखर सांगुळे, गजानन पांगरे, गोंिवद भिकाणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वनमजूर बळीराम नागरगोजे, श्रीराम सोळुंके, योगेश बडगिरे, वैजनाथ धोंडपुरे, सचिन सरकले, त्र्यंबक बिडवे, सय्यद अब्बास, भरत फड, बालाजी गडदे, मनोहर गडदे, पटूस सुरणर, राजपाल मोरे, विनोद सोनकांबळे, शिवाजी बडगिरे, उत्तम चव्हाण, शंकर मुसळे, मानंिसंग मुंडे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR