31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरअहमपूर मतदारसंघात गोंधळ गीतातून मतदार जनजागृती

अहमपूर मतदारसंघात गोंधळ गीतातून मतदार जनजागृती

अहमदपूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी अहमदपूर-चाकूर विधासभा मतदार संघात स्वीप पथकाद्वारे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी दररोजच गोंधळ,भारुड या प्रबोधनात्मक लोकगीतातून दि. १९ रोजी सायंकाळी फत्तेपूर या गावात उपस्थितीत शेकडो मतदार बंधू-भगिणींना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी संविधानाने आपणास दिलेला मतदानाचा हक्क दि. ७ मे रोजी कर्तव्य समजून  पार पाडावा असे स्वीप कला पथकाच्या वतीने आवाहन करण्यात आले.
गोंधळ ही एक धार्मिक लोककला आहे, जी सर्वसाधारणपणे साखरपुडा, लग्न, बारसे अशा मंगल प्रसंगी सादर केली जाते. अशा प्रसंगी गोंधळी लोकांना खास आमंत्रण देऊन बोलावले जाते पण या ठिकाणी मतदार बांधवांना आमंत्रण देऊन बोलावण्यात आले होते. त्यांच्याकरवी ‘सर्व कार्ये निर्विघ्न पार पाडू द्या’ असे आवाहन देवतांना केले जाते. त्या प्रमाणे ७ मे रोजी होणा-या लातूर लोकसभा निवडणूकीत १००% मतदान होण्यासाठी मतदारांना साकडे घालण्यात आले. रचनाकार मोहन तेलंगे यांनी शब्दबद्ध केलेली गोंधळ गीत संगीत अलंकार अर्चना माने यांनी सुरेल आवाजात गाऊन शेकडो प्रेक्षकांचे दाद मिळवीली.
या अभियानांसाठी लातूर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर, सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, अहमदपूरचे तहसीलदार शिवाजीराव पालेपाड, चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या आदेशाने मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘सृजन’ स्वीप पथक प्रमुख, महादेव खळुरे, शिवकुमार गुळवे, मोहन तेलंगे, नागनाथ स्वामी, धनंजय नाकाडे, श्रीमती अर्चना माने,आदिनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR