36.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रआता धावत्या ट्रेनमध्ये पैसे काढता येणार

आता धावत्या ट्रेनमध्ये पैसे काढता येणार

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये एटीएमची सुविधा देशातला पहिला प्रयोग!

मुंबई : प्रतिनिधी
सध्या ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु रेल्वे प्रवासादरम्यान काहीही खरेदी करायचे असल्यास त्यासाठी रोख रक्कमच बहुतेक वेळा द्यावी लागते. अशावेळी खिशात रोख रक्कम नसेल, तर प्रवाशांची मोठी अडचण होते. पण आता प्रवाशांची ही अडचण होणार नाही. कारण भारतीय रेल्वेने थेट धावत्या रेल्वेमध्येच एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

धावत्या ट्रेनमध्येच एटीएमचे मशिन बसवून त्या माध्यमातून प्रवाशांना खात्यातून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा देशभरातला पहिला प्रयोग आहे. अशा प्रकारचे पहिले एटीएम नाशिकमधील मनमाड ते मुंबई प्रवासी वाहतूक करणा-या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये बसवण्यात आले आहे. दररोज या ट्रेनने हजारो मुंबईकर व नाशिककर ये-जा करत असतात.

आता या प्रवासादरम्यान प्रवाशांना थेट एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध असेल.
मंगळवारी सकाळी ही चाचणी घेण्यात आली. पंचवटी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यामध्ये हे एटीएम बसवण्यात आले आहे. धावत्या ट्रेनमध्ये एटीएममधून पैसे काढण्याची ही चाचणी यशस्वी झाली आहे. इगतपुरी ते कसारा या पट्ट्यामध्ये नेटवर्कची समस्या आल्यामुळे तेवढा भाग वगळता इतर वेळी एटीएममधून विनासायास पैसे काढता येत असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR