30 C
Latur
Saturday, June 21, 2025
Homeलातूरआता पशुधनाचेही होणार आधारकार्ड 

आता पशुधनाचेही होणार आधारकार्ड 

लातूर : प्रतिनिधी
गायी, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांच्या कानात टॅग असले तरच लसीकरण किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार मिळतील अन्यथा मिळणार नाहीत. टॅगमुळे जनावरांचेही आधारकार्ड १९६२ भारत पशुधन  अ‍ॅपवर येणार आहे. टॅग जनावरांच्या कानात असेल. त्यावर बारा अंकी बारकोड असेल. या बारकोडमुळे जनावरांची सर्व इत्मंभूत माहिती अ‍ॅपवर उपलब्ध होईल.
लातूर जिल्ह्यात गायी, म्हशी ५ लाख १४ हजार ६९५ असून शेळ्या १ लाख ४८ हजार, मेंढ्या ३५ हजार ४५ आहेत. या सर्व जनावरांना कानात टॅग लावला जात आहे. जिल्ह्यातल्या १२५ पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत कार्यरत असलेले २५० कर्मचारी टॅग लावण्याच्या कामात व्यस्त आहेत. शासनाने २७ फेबु्रवारी २०२४ रोजी अध्यादेश काढून जनावरांना टॅग लावण्याचे काम सुरु केले आहे.
जनावरांच्या कानात टॅग नसेल तर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार किंवा शासनाची कोणतीच सुविधा मिळणार नाही. औषधोपचार, लसीकरण, अनुदान, चारा, छावण्याचां लाभ घ्यायचा असे तर जनावरांच्या कानात टॅग असणे गरजेचे आहे. याउपर जनावरांचे जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, खरेदी, विक्री, मालकाची माहिती, दाखला, वाहतूक, आजार कोणता झाला, कत्तलखान्याकडे जाणा-या जनावरांची माहिती टॅगवरील बारा अंकी बारकोडमुळे मिळणार आहे. जनावरांची सर्व माहिती टॅगने उपलब्ध होणार असल्याने शासनास औषध खरेदी, उपचार करण्यास दरवर्षी सोपे होणार आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यत ६ लाख जनावरांना टॅग लावण्याचे काम झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR