22 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeलातूरआत्तापर्यंत २५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

आत्तापर्यंत २५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

लातूर : प्रतिनिधी
समाजातील अनेक लोकांना आपल्या पाल्यास उच्च शिक्षण शिकवण्यासाठी पैसा नसतो ग्रामीण भागात शेती करुन मुलांना बाहेर शिकवणीसाठी ठेवणे क्लास लावणे त्याची शैक्षणीक फिस भरणे आवघड असते अशा परिस्थितीत सामजिक बांधीलकी म्हणुन रेणापूर तालुक्यांतील निवाडा (दिलीपनगर)  येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून लातूर ग्रामीणचे  माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासरावजी देशमुख यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र लातूर व निवाडा येथे असून अभ्यासिका नि:शुल्क  २०२१ साली सुरु करण्यात आली. या केंद्राचा आतापर्यंत २५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
गेल्या चार वर्षात हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सर्वसामान्य व गरजूं विद्यार्थ्यांना आधारवड ठरत आहे  या अभ्यासिका केंद्रातून दोन हजार पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी लाभ घेवून आज याच केंद्राचे ४० पेक्षा जास्त विद्यार्थी शासकीय नोकरी, बँकिंग, आरोग्य, कृषी, सहकार तसेच विविध मोठया कंपन्यामध्ये उच्च पदावर विराजमान झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मागील चार वर्षात विद्यार्थ्यांच्या प्रवेशांची वाढती संख्या पाहता इथून पुढे सीईटीच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांनाच स्पर्धा परीक्षा केंद्रात  मोफत प्रवेश मिळेल त्याकरिता १६ फेब्रुवारी   रोजी ११  ते १२ या वेळेत उएळ एंट्रन्स परीक्षा होईल. त्यात पास होणा-या विद्यार्थ्यांनाच स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मोफत सुविधा मिळतील व इतर विद्यार्थ्यांना माफक शुल्क आकारले जातील.असा निर्णय  घेण्यात आलेला आहे.
मुलांना अध्यापनासाठी महाराष्ट्रातील तज्ञ प्राध्यापक, निवड झालेले अधिकारी यांच्याशी संवाद साधण्याची संधी, तसेच मुलांना अभ्यास करण्यासाठी  ग्रंथालयात स्पर्धा परिक्षा पुस्तके  तसेच सर्व वृत्तपत्रे ,मासिक इंग्रजी, हिंदी, मराठी, उच्च दर्जाचे साधन उपलब्ध करून दिलेली आहेत तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना अभ्यासासाठी स्वतंत्र एअरकंडीशन रीडिंग रुम व हॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचा सर्व गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी लाभ घ्यावा आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे यांनी केले आहे यासाठी या केंद्राचे समन्वयक प्रा. विनोद नवगीरे ९१७२१६१६८३, ९१७५००६५६७  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन  रेणा साखर कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR