23.9 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्र  आदेश आला तर विधानसभा लढविणार 

  आदेश आला तर विधानसभा लढविणार 

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
 नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत  छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विजयी होतील, असा अंदाज सगळ्याच सर्व्हेंमधून वर्तवण्यात आला होता. पण महायुतीचे संदिपान भुमरे निवडून आले. माझ्याकडे पैसे नव्हते, आम्ही गाफील राहिलो आणि पक्षातीलच काहीजणांनी काम केले नाही, म्हणून पराभूत झालो. असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
  दरम्यान, एका कार्यक्रमात चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचाल, लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून झालेला पैशाचा वापर, पक्षातील काही नेत्यांकडूनच झालेला दगाफटका यासह अनेक विषयांवर आपली भूमिका आक्रमकपणे मांडली.
पुढे बोलताना खैरे म्हणाले, आता उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर मी पश्चिममधून विधानसभा लढवायला तयार आहे, असे सांगत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे  यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत.
लोकसभा निवडणुकीत सलग दुस-यांदा झालेला पराभव चंद्रकांत खैरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवून कमबॅक करण्याची खैरे यांची तयारी सुरू होती. परंतु भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करवून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी त्यांचा डाव उधळल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे.
 राजू शिंदे यांचा प्रवेश आपल्याला विश्वासात न घेता झाला, असा आरोप करत खैरे यांनी पुन्हा एकदा अंबादास दानवे  यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या बोट दाखवले. लोकसभा निवडणुकी दरम्यान, माझ्यावर विरोधकांनी संपत्ती, चहा, कॉफीचे मळे, शेकडो एकर जमीन, कंपन्या असल्याचा दावा केला होता. तो नाकारत छोटी कंपनी सोडली तर माझ्याकडे काहीच नाही.
 आगामी विधानसभा निवडणुकीत सहा मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना असलेल्या सहानुभूतीच्या जोरावर आम्ही महायुतीला धूळ चारू, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR