26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या विजय रथासमोरील आव्हान!

मुख्यमंत्र्यांच्या विजय रथासमोरील आव्हान!

मुंबई : प्रतिनिधी
यंदा ठाण्याचा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ चर्चेत आहे, याचं कारण आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यापूर्वी या मतदारसंघाची कधी इतकी चर्चा झाली नव्हती. पण आता चर्चा होतेय, कारण स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मतदारसंघातून उमेदवार आहेत. दोन दिवसांपूर्वी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांनी ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून भव्य शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाणे हा ९० च्या दशकापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे.

सातत्याने इथून शिवसेनेचे आमदार, खासदार निवडून आले आहेत. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. दोन गट झाले. सध्या अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाण्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाची ताकद दिसून आली. शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे २ लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आले.

ठाणेकरांनी आपण एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा कौल दिला. त्यामुळे विधानसभा निवडणूक मुख्यमंत्र्यांसाठी तशी सोपी आहे. या मतदारसंघात त्यांच्यासमोर असं मोठ आव्हान नाही. उद्धव ठाकरे गटाने स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली. उद्धव ठाकरे यांनी केदार दिघेंना उमेदवारी देऊन भावनिक कार्ड खेळलं आहे. आनंद दिघे हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते होते. शिवसेना पक्ष घराघरात पोहोचवण्यात, मनामनात रुजवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एकनाथ शिंदे हे नेहमीच आनंद दिघे हे राजकीय गुरु, मार्गदर्शक असल्याच सांगत आले आहेत. केदार दिघे हे नात्याने आनंद दिघे यांचे भाचे आहेत. पण आनंद दिघेंचे राजकीय वारसदार, उत्तराधिकारी म्हणून एकनाथ शिंदेंकडे पाहिले जाते.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या विजयात अडचणी येण्याची शक्यता कमी आहेत. स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदे यांना आव्हान देऊ शकणारा एकही नेता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाकडे नाही. एकनाथ शिंदे २००४ पासून २०१९ पर्यंत सलग चार वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकले आहेत. २००४ साली ठाणे शहर हा मतदारसंघ अतिशय मोठा होता. पण २००८ साली मतदारसंघ पूनर्रचनेनंतर ठाणे शहरातून कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ वेगळा झाला. एकनाथ शिंदे यांनी नेहमीच या मतदारसंघातून जवळपास लाखाच्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे.

कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून १४ उमेदवारांचे १८ अर्ज दाखल करण्यात आले होते. आजच्या अर्ज छाननीच्या दिवशी दोन अर्ज अवैध ठरले, तर १२ उमेदवारांचे १६ अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अर्ज देखील वैध ठरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR