23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रआमचं घड्याळ चोरलं

आमचं घड्याळ चोरलं

जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला

ठाणे : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर त्यांनी दावा सांगितला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने याबाबतचा निर्णय दिला. आता आज ठाण्यात बोलताना त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घड्याळ या निशाणीवरून त्यांनी अजित पवार गटाला चोर म्हणत टीका केली.

आमचे घड्याळ चोरले गेले आहे. आता आमची निशाणी तुतारी आहे. लक्षात ठेवा कोण एक धोकेबाज या विभागात कामच केलं नाही. तोही घड्याळ घेऊन प्रचार करेल. मात्र तुम्ही हा नका विचार करू की ही जितेंद्र आव्हाड यांची घडी आहे. ही माझ्या हातातून चोरली गेलेली घडी आहे. तुम्ही त्या घड्याळाची वाट पाहू नका. त्या घड्याळाचा वेळ बदललेला आहे. त्या घड्याळाची वेळ आता ४-२० आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, युद्धात देखील सैनिक जातात तेव्हा देखील तुतारी वाजवली जाते. राम जेव्हा वनवासात गेले होते त्या दरम्यान आणि अयोध्येत परत आले तेव्हा देखील तुतारी वाजवली गेली होती. हे चोर आमची घडी घेऊन गेले. हे सर्व पाकीटमार आहेत.

आता तुतारीकडे लक्ष द्या
आधी घड्याळाची वेळ १०-१० होती. आता ४-२० झाली आहे. चोरट्यांनी पाकीट मारले आणि माझी घडी काढून घेतली. त्यानंतर माझी निशाणी आता तुतारी आहे.. तुतारी ही निशाणी आपली आहे. आतापासून लक्षात ठेवा की जितेंद्र आव्हाड यांची निशाणी म्हणजे तुतारी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR