लातूर : प्रतिनिधी
विलासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने आपले ग्रामीणचे लोकप्रिय आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी गेल्या पाच वर्षांत रेणापूर ग्रामीणच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. या निधीतून रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण करता आल्या आहेत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गेल्या पाच वर्षाखाली लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार धीरज देशमुख यांना सर्वाधिक मतांनी निवडूण दिले. तुम्ही टाकेला विश्वास आमदार धिरज देशमुख यांनी सार्थ ठरवत लातूर ग्रामीणचा सर्वांगीण विकास केला. आगामी काळातही आपण आमदार धिरज देशमुख यांना आशिर्वाद द्याल, अशी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले.
रेणापूर तालुक्यातील बिटरगाव येथे दि. २८ ऑगस्ट रोजी महिला बचत गटांचा मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी बिटरगाव बचत गटांच्या महिलांना संवाद साधताना श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी रीड लातूरच्या अध्यक्षा सौ. दीपशिखा धीरज देशमुख, डॉ. सारिका देशमुख, सुनिता अरळीकर, पुजाताई इगे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, रेणाचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, जिल्हा बॅकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, युवराज जाधव, धनंजय देशमुख, यांची प्रमुख उपस्थिती होती.
बिटरगाव येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यात पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या की, महिला बचत गटाच्यां महिलांना आपला छोटा-मोठा नवीन उद्योग करता यावा यासाठी जिल्हा बँकच्या माध्यमातून महिलांना अनुदानात वाढ करुन ती ५ लाख रुपये करण्यात आली आहे. त्याबरोबर जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतक-यांना बिन व्याजी ५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. आपले आमदार धीरज देशमुख यांनी गोर-बरीब शेतक-यांसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून ही योजना राबवली आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांनी मराठवाड्यात साखर कारखाने उभे केले. त्याचबरोबर मांजरा नदीवर बराजेसची उभारणी करुन शेतक-यांना पाण्याची सोय करुन दिली. आपल्या साखर कारख्यान्यामार्फत जिल्ह्यातील एकही शेतकरी बांधवाचा ऊस राहत नाही. हे सर्व कारखाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत. शेतक-यांच्या विकासासाठी साखर कारखांची उभारणी करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
रेणापूर तालूक्यातील पळशी येथे बचत गटांचा महिला मेळावा झाला. यावेळी महिलांशी संवाद साधताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या की, विकसरत्न विलासराव देशमूख यांनी या भागाचा आणि या भागातील लोकांच्या विकासात योगदान दिले आहे. आज माजी मंत्री दिलीपराव देशमूख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित देशमूख व आमदार धीरज देशमूख हेच काम पुढे घेऊन जात आहेत, असे त्या म्हणाल्या.
बिटरगाव येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यास मीना चव्हाण, प्रेमला पाटील, शालूबाई साके, सुदामती बोडके, पल्लवी वाकडे, हंसराज देशमुख, मधुकर चव्हाण, अमर वाकडे, शांताबाई वाकडे, कौशल्या पाटील, अक्षता देयमुख, संजना सोमासे, अजंली साखरे, प्रनिता सरवदे आदींसह गावातील नागरीक व बचतगटातील महिला मोठया संख्येने उपस्थितीत होत्या. तर पळशी येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यास उध्दव जाधव, दशरत जाधव, अनिता कदम, निर्मला गायकवाड, वर्षा भंडारे, कल्पना जाधव, उषा उपाडे, अनिता कदम, रेषमा भंडारे, वर्षा जाधव, सुमन जाधव, भाग्यश्री जाधव, सुरेखा उपाडे, मंगल जाधव, उषा शिंदे, सरोजा जाधव, मिरा जाधव आदी महिला उपस्थित होत्या.