निलंगा : प्रतिनिधी
भाजपाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी गुरुवारी दि २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दि २९ ऑक्टोबर रोजी शक्तीप्रिदर्शन करून उमेदवारी अर्ज भरणार असले तरी राज्यातील अनेक दिग्गज नेते वेगवेगळ्या मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत असतात त्याचाच एक भाग म्हणून आमदार निलंगेकर यांनी गुरुपुष्यामृत या विजय शुभ मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
निलंगा विधानसभा निवडणुकीकरिता दि २४ ऑक्टोबर २०२४ रोजी ९ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे. ३ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण ४५ नामनिर्देशन पत्र नेण्यात आले आहे. आजचे दाखल नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारात ंिलंबनप्पा रेशमे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व १ अपक्ष संभाजी पाटील निलंगेकर (भाजपा), डॉ. शोभा बेंजरगे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व १ अपक्षांचा समावेश आहे. तीन दिवसात ४५ नामनिर्देशन पत्राची विक्री झाली असून तीन उमेदरांनी ५ अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांनी दिली.