18.2 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeलातूरआरक्षण देतो म्हणून फसवणूक करणा-या महायुतीला धडा शिकवा

आरक्षण देतो म्हणून फसवणूक करणा-या महायुतीला धडा शिकवा

लातूर : प्रतिनिधी
सध्याचे महायुतीचे सरकार हे तोडमोड करुन सत्तेत आलेले घटनाबा  सरकार असून या सरकारला आपण वेळी हद्दपार करण्याची गरज आहे. धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून फसवले आता या सरकारचा निकाल येणा-या २०  तारखेला आपल्याला द्यायचा आहे, असे सांगून पुन्हा सरकारकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सावध राहिले पाहिजे. लातूर ग्रामीणचे लोकप्रिय उमेदवार आमदार धिरज देशमुख व लातूर शहर मतदार संघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार अमित देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे त्यांना आशिर्वाद द्यावेत असे आवाहन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.
धनगर समाजाच्या वतीने येथील विष्णुदास मंगल कार्यालय येथे आयोजित सुसंवाद बैठकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज विलासराव देशमुख, पु. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर, माजी आमदार रामहरी रुपनवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर, आबासाहेब पाटील, शाम भोसले, अ‍ॅड. दीपक सूळ, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, महेंद्र भादेकर, संभाजी सुळ, एकनाथ पाटील, शेषेराव हाके, चंद्रकांत देवकते, शिखंडी हरवाडीकर, रमेश सोनवणे, कैलास होळकर, विष्णू धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, काँग्रेस पक्षाकडून धनगर समाजाला सत्तेमध्ये काम करण्याची संधी दिली असून लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, महापौर, संचालक अशी पदे देऊन सन्मान केलेला आहे. भविष्यातसुद्धा आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करणार असुन आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा हात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेची मशाल यांना मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले
धनगर समाज हा धनाचा आगार आहे. लातूर आणि बारामतीमधील राजकारणामध्ये शिस्त आहे. आपले कुटुंब आपल्यासाठी लढतायत, अशा कुटुंब प्रमुखाला आपण विजयाचा भंडारा लावावा, असे सांगून जो समाज बांधवांना सोबत घेऊन जातो त्याच्यासोबत आपण राहिले पाहिजे.  घोंगडी व काठी धनगर समाजाची अस्मिता आहे. महायुती सरकारने विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, शैक्षणिक सवलत, महामंडळ, घरकुल, आरक्षण देतो म्हणून मते घेतली. पण त्यांनी काहीच दिले नाही. त्यांना हद्दपार करा. महायुतीने फक्त्त जातीपातीमध्ये भांडणे लावली आहेत. रोजगार, शिक्षण, महिला सक्षमीकरण यासाठी स्वाभिमानी असणारे राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आपण आपली ताकद उभी करावी, असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले.
आपण सुसंस्कृत नेतृत्वाला निवडून द्यावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत  पाटील नेहमी म्हणतात की, माझे आवडते मुख्यमंत्री हे विलासराव देशमुख होते. आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे की काँग्रेस एक चळवळ आहे. सगळे संपतील पण काँग्रेस संपणार नाही, असे सांगून या निवडणुकीत घोंगडी व काठीची ताकद दाखवा आणि खोके सरकारला हद्दपार करा,  असे आवाहन सक्षणा सलगर  यांनी समाज बांधवांना केले.
याप्रसंगी माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी धनगर समाजाचा इतिहास सांगितला. लातूरच्या नेतृत्वाने धनगर समाजांना समाजाला सन्मान दिला असल्यांचे सांगून धनगर समाजाच्या आरक्षणास देवेंद्र फडणीस यांचा विरोध असल्याची टीकाही त्यांनी याप्रसंगी केली. महाराष्ट्रात दोनच छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे छत्रपती यशवंतराव होळकर आणि हा आपला इतिहास टिकवायचा असेल तर महाविकास आघाडीला मतदान करावे असे आवाहन माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी केले.
यावेळी भाऊसाहेब हाके, रामकिसन मदने, दिलीप गोटके, गुंड्डरगे, शिवाजी भिसे, रामभाऊ माने, कविता वाडेकर, बालाजी सुरवसे, बालाजी वाघमारे, बालकृष्ण धायगुडे, जगदीश माळी, शुभम पडूळकर, बालाजी पांढरे, रमेश सुरवसे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR