लातूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना भाग -२ अंतर्गत मंजूर झालेल्या आर्वी नांदगाव रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. या कामात दाणेदार उपआधार, खडीकरण आणि एम.पी.एम.चे काम पूर्ण झाले असून, २० मी. मी. पूर्व मिश्रित जाडीचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे आल्या, या संदर्भाने त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांना सुचना केल्या तसेच काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांना रस्त्याचे होत असलेले निकृष्ट काम थांबवून चांगले काम करण्यात यावे, असे निवेदन देण्याच्या सूचना केल्या. त्यानूसार सदर निवेदन काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव आणि पदाधिकारी यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सुचनेवरुन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारÞी राहुलकुमार मीना यांची बुधवार दि. १९ मार्च रोजी दुपारी भेट घेतली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना भाग-२ अंतर्गत मंजूर झालेल्या आर्वी-नांदगाव रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या कामातील दाणेदार उपआधार, खडीकरण आणि एम.पी.एम.चे काम पूर्ण झाले असून, २० मी. मी. पूर्व मिश्रित जाडीचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, होत असलेले निकृष्ट काम थांबवून चांगले काम करण्यात यावे असे निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना भाग – २ अंतर्गत मंजूर झालेल्या आर्वी-नांदगाव रस्त्याचे काम निविदेतील अटी, शर्तींनुसार होत नसल्यामुळे हा रस्ता जास्त दिवस टिकणार नाही. यामुळे नागरिकांना त्रास होईल आणि शासनाचा खर्चही वाया जाईल. त्यामुळे २० मी. मी. पूर्व मिश्रित जाडीचे काम काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या सांगून हे निकृष्ट काम तातडीने थांबवावे.
या कामाची चौकशी करावी आणि निविदेप्रमाणे दर्जेदार काम करावे. अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, विलास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, विलास बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, रघुनाथ शिंदे, अनंत बारबोले, सुभाष माने, गोवर्धन मोरे, नितीन पाटील, विलास भोसले, रमेश देशमुख, श्याम बरुरे, रामराव साळुंके, तात्याराव पालकर, दिपक बनसोडे, रसुल पटेल आदी उपस्थित होते.