24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना हात जोडून केली विनंती

आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना हात जोडून केली विनंती

मुंबई : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील बोलणी फिस्कटली असून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आंबेडकरांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांना ‘तुम्ही आंबेडकरी विचारांचे पुसस्कर्ते आहात, घेतलेल्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा’, अशी हात जोडून विनंती केली आहे.

दरम्यान, आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत न जाता ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याचे पाहयला मिळत आहे. पण यामुळे आता मविआमध्ये खळबळ उडाली आहे. कारण आंबेडकरांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतली आहे. याबाबत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती आहे की, तुम्ही आंबेडकरी विचारांचे पुसस्कर्ते आहात, तुमचे आंबेडकरी विचारांशी रक्ताचे नाते आहे आणि आमचे विचारांचे नाते आहे. त्यामुळे रक्त आणि विचार एकत्र आले की आपण कोणालाही थोपवू शकतो. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा.
तर मी माझी भूमिका मांडली आहे. त्यांना कळत की कळत नाही. हे मी नाही सांगणार.

कारण ते माझ्यापेक्षा फार मोठे आहेत. ते वकील आहेत. त्यांच्या अंगात आंबेडकरांचे रक्त आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. पण शत्रूच्या विचाराशी लढताना एक पाऊल मागे घ्यावे लागते. त्यामुळे आंबेडकरांनी न रागवता याबाबतचा विचार करावा असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती केली आहे. तसेच, जागावाटपाबाबत जे काही तिढे आहेत, ते सर्व तिढे सुटले जातील, असे आव्हाडांकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR