लातूर : प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणा-या गोरगरीब भाविकांच्या सोयीसाठी प्रतिवर्षाप्रमाणे मोफत पंढरपूर यात्रा वारकरी सेवा यंदाही येथील श्री सत्संग प्रतिष्ठान यांच्या वतीने दि. १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती बसस्थानक येथून मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
जिल्हाभरातील इच्छुक भाविकांनी दि. १५ जुलैपर्यंत आपल्या ओळखपत्रासह नाव नोंदणी करुन आपले पास घेण्याचे आवाहन श्री सत्संग प्रतिष्ठान समिती लातूरतर्फे करण्यात आले. हा उपक्रम प्रतिष्ठानतर्फे मागील २४ वर्षापासून राबविला जात आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे असवाहन श्री सत्संग प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद परीक, सचिव चंदुसेठ लड्डा, रमेश भुतडा, दत्ता लोखंडे, शाम मुंदडा, लक्ष्मणराव मोरे, गणेश देशमुख, अॅड. बळवंत जाधव, राजा मणियार, नंदकिशोर लड्डा, संजय लड्डा, राम शिंदे, नाना लोखंडे, मकरंद सावे, निलेश ठक्कर, दिलीप माने, जुगलकिशोर झंवर, द्वारकादास मंत्री, बालाजी बारबोले, प्रकाश कासट, रमेश राठी, प्रकाश पवार, मधुसुदन पारीक, छोटु गडकरी, लक्ष्मीकांत बियाणी, लक्ष्मीकांत सोमाणी, गोवर्धन भंडारी, आशोक भोसले, जगन्नाथ पाटील, केतन हलवाई, संग्राम खंदारे व श्री सत्संग प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी केले आहे.