गुरदाळ खून प्रकरणी १२ आरोपींना जन्मठेप

उदगीर : प्रतिनिधी
राजकीय विरोध व वैयक्तिक द्वेषातून उदगीर तालुक्यातील गुरदाळ येथील दिगांबर पाटील यांची घरी जेवण करीत असताना डोक्यात काठीने हल्ला करुन खून केला होता. या प्रकरणी शुक्रवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आर.एम. कदम यांनी सदर गुन्ह्यातील तेरा आरोपी पैकी एक मयत वगळून बारा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला  आहे.
उदगीर तालुक्यातील गुरदाळ येथे दि. २३ मे २००३ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास दिगंबर यशवंतराव पाटील वय-५८ वर्षे हे घरी जेवण करीत असताना आरोपींनी संगनमत करुन घरात घुसून राजकीय शत्रुत्व व वैयक्तिक द्वेषापोटी ओसरीत जेवताना त्यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. व त्यांना खेचून आणून प्रचंड असा लाठी हल्ला करीत त्यांचा जागीच खुन केला. व त्यांच्या घरातील इतर लोकांना व नातेवाईकांना जबर जखमी केले. याप्रकरणी मयताचा मुलगा बसवराज दिगंबर पाटील यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर प्रकरणात पोलिसांच्या वतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उदगीर येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
सदरील खटल्याची सुनावणी पीठासीन अधिकारी सत्र न्यायाधीश श्रीमती आर.एम. कदम यांच्या न्याय दालनात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने एकुण तेरा साक्षीदाराची साक्ष नोंदविली. तर बचाव पक्षाचे वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणी दरम्यान एकुण तेरा आरोपी पैकी एका आरोपीची मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. गौसपाशा सय्यद यांना अ‍ॅड. शिवकुमार गिरवलकर, अ‍ॅड. एस. आय. बिराजदार, अ‍ॅड, बालाजी शिंदे, अ‍ॅड. प्रभुदास सुर्यवंशी यांनी सहकार्य केले. व तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हेडकाँस्टेबल अक्रम शमशोदिन शेख यांनी सहकार्य केले. खटल्याचा निकाल लागणार असल्याने न्यायालय परिसरात नागरिक, नातेवाइकांची प्रचंड गर्दी झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news