28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरआषाढी वारीतील दिंड्यांच्या अनुदानाला वारक-यांचा विरोध

आषाढी वारीतील दिंड्यांच्या अनुदानाला वारक-यांचा विरोध

सोलापूर : आषाढी वारीमध्ये सहभागी होणा-या दिंड्यांना राज्य शासनाकडून यंदा प्रथमच २० हजार रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाला अनेक वारक-यांनी विरोध केला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा गोरगरीब वारक-यांसाठी असून, या विरोधामागे अप्रत्यक्ष राजकारण होत असल्याचा आरोप धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केला आहे.

अनुदानाला वारक-यांचा विरोध, देवस्थानाचे समर्थन
शासनाने जाहीर केलेल्या निधीला अनेक वारक-यांनी विरोध दर्शवला असताना, दुसरीकडे मंदिर देवस्थानाने मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुक्ताई संस्थानच्या वतीने आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचा पंढरपूरमध्ये जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे अक्षय महाराज भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

यंदा पालखी प्रमुखांनाही महापूजेचा मान
दरवर्षी आषाढी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याचा मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीचा असतो. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात ही परंपरा आहे. परंतु, यंदा याला जोडूनच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी आषाढीच्या शासकीय महापूजेस १० मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना निमंत्रण दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पालखी प्रमुखांनाही महापूजेचा मान मिळणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

यंदा शासनाने पालखी सोहळ्यातील दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील वारकरी संप्रदायाला खुश करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत वारकरी संप्रदायाने केले होते. त्यानंतर आता दुसरा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता आषाढीच्या शासकीय महापूजेस १० मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना निमंत्रण दिले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख अक्षय महाराज भोसले यांनी यासाठी पाठपुरावा केल्याने पुन्हा एकदा महायुतीत शिंदे शिवसेनेला मोठा फायदा मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR