39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeपरभणीआहेरवाडी शिवारात कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

आहेरवाडी शिवारात कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

पूर्णा : झिरोफाटा ते पूर्णा रस्त्यावरील आहेरवाडी शिवारात एका बंद असलेल्या आश्रम शाळा परिसरात एका अनोळखी ५० वर्षीय इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील विवस्त्र मृतदेह दि.१६ मार्च रोजी ५ वाजेच्या सुमारास आढळला आहे.

पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा रस्त्यावर आहेरवाडी शिवारात बंद आश्रम शाळा आहे. याच्या बाजुलाच आहेरवाडी येथील मोरे कुटुंबीयांची शेती आहे. दि.१६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मोरे यांच्या शेतात काम करणारा सालगडी संतोष मोरे यास वास येत असल्याने त्याने वासाचा मागावा काढला असता एका ५० वर्षे पुरुष जातीचा इसम मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत निदर्शनास आला. त्याचा चेहरा देखील ओळखू येत नसल्याने ही माहिती पोलीस पाटील बालाजी मोरे यांना कळवली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.समाधान पाटील, पूर्णा सपोनी दर्शन शिंदे, फौजदार केंद्रे, पोकॉ. श्याम कुरील, शेंबेवाड आदींनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. सदरील ईसम नेमका कोण आहे याचा तपास पूर्णा पोलीस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR