38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरशहरासाठी उपमुख्यमंत्री पवारांनी मंजूर केला ७ कोटीचा निधी

शहरासाठी उपमुख्यमंत्री पवारांनी मंजूर केला ७ कोटीचा निधी

सोलापूर-
शहरात विविध समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व इतर विकास कामांसाठी १५ कामह्यासाठी एकूण ७ कोटीचा निधी अवघ्या ४८ तासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला आहे. त्याचा शासन निर्णय ही काढण्यात आला असून तसे आदेश महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक किसन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस चेतन गायकवाड उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे ३ मार्च रोजी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शहरातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. विविध समाज घटकांशी चर्चा करून समस्या, प्रश्न आणि करावयाची विकास कामे यासंदर्भात चर्चा केली होती. याच दौऱ्यात त्यांनी आपल्या भाषणात सोलापूर शहराचा मिनी भारत म्हणून उल्लेख केला होता. सोलापूर शहर हे बहुभाषिक शहर आहे. यामुळे येथील सर्व जाती धर्मातील समाज घटकांना घेऊन काम करावे लागणार आहे. सर्व समाज घटकांना न्याय दिला पाहिजे. शहरात एकापेक्षा अधिक कार्याध्यक्ष पद देण्याची जर पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली असेल आणि पक्षाला योग्य वाटले तर सोलापूर शहरांतर्गत तीन विधानसभा निहाय पक्षाचे कार्याध्यक्ष नियुक्त केले जाऊ शकतात.

विविध समाजासाठी संस्कृत संस्कृतिक भावनांची गरज होती. त्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंबईत मंत्रालयात जाऊन मागणी केली होती. त्यांनतर तत्काळ त्यावर अंमलबजावणी करत उपमुख्यमंत्री पवार यांनी विविध १५ विकास कामांना मंजुरी देत सात कोटीचा निधी मंजूर केला. अवघ्या ४८ तासात त्याची अंमलबजावणी झाली. तसा शासन निर्णय आणि आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत शहरातील विविध समाज घटकांसाठी हे भवन बांधण्यात येणार असल्याचेही प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR