इंधनाचे दर गगनाला भिडले; ट्रॅक्टर मशागत महागली 

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
सतत वाढणा-या डिझेलच्या दरांमुळे शेती मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून याचा थेट फटका शेतक-यांना बसत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटर, पेरणी आदी कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर करत आहेत. मात्र डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे दर वाढवल्याने शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
यंदा बियाणे, खते, कीटकनाशके यांचे दर आधीच वाढलेले असताना त्यात मशागतीचा खर्चही वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. अनेक लहान व अल्पभूधारक शेतक-यांना शेती करणे परवडेनासे झाले असून कर्ज काढून शेतीची तयारी करावी लागत आहे. पुर्वी प्रति एकर मशागतीसाठी लागणारा खर्च तुलनेने कमी होता. मात्र डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर चालकांनी दरात वाढ केल्याने प्रति एकर खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी शेतक-यांच्या शेती बजेटवर अतिरिक्त भार पडत आहे. शेतकरी संघटनांनी केंद्र व राज्य शासनाने इंधनावरील कर कमी करून डिझेलचे दर नियंत्रणात आणावेत, तसेच कृषि क्षेत्रासाठी सवलतीच्या दरात इंधन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान शेतीसाठी आवश्यक सर्व घटकांच्या वाढत्या किमती आणि इंधन दरवाढ यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतक-यांसाठी मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news