24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयइराणच्या गावात ८२.२ अंशावर पारा

इराणच्या गावात ८२.२ अंशावर पारा

डेरेस्टन : वृत्तसंस्था
इराणमधील एक गाव होरपळत आहे. येथील तापमान केंद्राने २८ ऑगस्ट रोजी ८२.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. पृथ्वीवर सर्वाधिक नोंद करण्यात आलेले हे तापमान ठरले आहे. अमेरिकेचे हवामानतज्ञ कॉलिन मॅकार्थी यांनी ‘एक्स’वर यासंबंधी माहिती दिली आहे. परंतु त्यांनी या तापमान नोंदीवर साशंकताही व्यक्त केली आहे, याप्रकरणी अधिकृत तपासणीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इराणच्या दक्षिण किना-यावरील डेरेस्टन वायुतळानजीक असलेल्या हवामान केंद्राने २८ ऑगस्ट रोजी १८० फॅरेनहाइट डिग्री (८२.२ सेल्सिअस)तापमान आणि ९७ फॅरेनहाइट डिग्री (३६.१ सेल्सिअस)चा ओस बिंदू नोंदविला आहे. या घटनेने पूर्ण जगातील हवामानतज्ञांची चिंता वाढली आहे. ओस बिंदू असे तापमान असते, जेथे हवा आर्द्रता रोखून धरू शकत नाही. ४० ते ५४ अंश सेल्सिअसच्या तापमानात दीर्घकाळ राहिल्याने उष्माघाताचा धोका वाढत असतो.

पश्चिम आशियात उष्मालाट : अमेरिकेचे हवामानतज्ञ मॅकार्थी यांच्यानुसार पश्चिम आशियात अत्यंत चिंताजनक उष्मालाट निर्माण झाली आहे. सौदी अरेबियाच्या धाहरनमध्ये असलेल्या हवामान केंद्राने ९३ फॅरेनहीट डिग्री (३३.९ अंश सेल्सिअस) पर्यंतचा ओसबिंदू नोंदविला आहे. पश्चिम आशियाच्या अनेक क्षेत्रांमध्ये तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR