24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्र‘ईव्हीएम’ छेडछाड प्रकरण ;लंकेंचे गैरसमजातून आरोप

‘ईव्हीएम’ छेडछाड प्रकरण ;लंकेंचे गैरसमजातून आरोप

अहमदनगर : प्रतिनिधी
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करताना एक बेकायदेशीर व्यक्ती निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडल्याचा दावा केला होता. निलेश लंके यांनी अपु-या माहितीवर आरोप केले आहेत. ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाला तिहेरी सुरक्षा लावण्यात आली आहे.

ज्या गोदामात ईव्हीएम मशिन ठेवल्या आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सीसीटीव्हीचे एक वायर लूज झाले होते. हे लक्षात आल्यानंतर येथील कर्मचा-यांनी रीतसर नोंद करून आतमध्ये जाऊन वायर रिपेअर करून पुन्हा बाहेर आला असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचे सहकारी राहुल झावरे यांनी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपवर सांगितले की, २१ मेच्या रात्री ८ वाजून २२ मिनिटांनी अचानक एक व्यक्ती गोदामाच्या शटरजवळ आला. पोलिस सीआरपी सुरक्षा यंत्रणेला कोणतीही कल्पना न देता या ठिकाणी व्यक्ती आलाच कसा? असा प्रश्न केला. सुरक्षा यंत्रणा असताना गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेमध्ये छेडछाड करत असताना निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी तो डाव हाणून पाडला. केंद्र, राज्य, स्थानिक पोलिस ही तिहेरी सुरक्षा असताना हा व्यक्ती आत आला कसा? याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी लंके यांनी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR